बोपण्णा दुसर्‍या फेरीत, सानिया पराभूत

0

पॅरिस । फ्रेंच ओपन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णाने पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. सानिया मिर्झाचे महिला दुहेरीतील आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. बोपण्णा व त्याचा उरुग्वेचा साथीदार पाब्लो क्मयुवेस यांनी फ्रान्सच्या मथायस बोर्ग व पॉल हेन्री मॅथ्यू यांचा 6-1, 6-1 असा एकतर्फी धुव्वा उडविला.

नवव्या मानांकित जोडीने केवळ 53 मिनिटांत हा सामना संपविला. सानिया मिर्झा व कझाकची यारोस्लाव्हा श्वेडोव्हा यांना मात्र पहिल्याच फेरीत रशियाची पॅव्हल्युचेन्कोव्हा व ऑस्ट्रेलियाची गॅवरिलोव्हा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.