बोपोडी ः प्रतिनिधी – बोपोडीत बचत गटाच्या महिलांसाठी ‘बाल लैंगिक अत्याचार’ यासंदर्भात नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत काम करणार्या चाईल्ड हेल्पलाईनच्या सविता दिवटे, सुमित्रा बनसोड, जयश्री पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी दीपज्योती यादव, अनिकेत कळंबे, वैभव माळी यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. धकाधकीच्या जीवनात पालकांनी आपल्या मुलांशी वेळोवेळी संवाद साधावा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. तसेच चाईल्ड हेल्पलाईन कशाप्रकारे काम करते, याची सविस्तर माहिती महिलांना दिवटे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपज्योती यादव यांनी केले. तर, अनिकेत कळंबे याने आभार मानले.