बोरकुंड येथे बंधारा खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ

0

धुळे । तालुक्यात जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून 2011पासून सिंचनाची कामे सुरू असून त्याचे फलित आज पहायला मिळत आहेत. जवाहरचे बंधारे पाण्याने तुडूंब भरले असून त्याचा शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात फायदा होत आहे. यापुढेही नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे सुरूच राहतील त्यासाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करावे असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी बोरकुंड येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी केले. बोरकुंड येथे बंधारा खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला. या कामाचा प्रारंभ माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

जवाहन सिंचन चळवळ राबविणार
यावेळी रोहिदास पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यात मी नेहमीच सिंचनाच्या कामाला प्राधान्य दिले. त्यामुळे आज येथील शेती सुजलाम सुफलाम होतांना दिसत आहे. जवाहर सिंचन चळवळ संपूर्ण तालुक्यात यापुढेही राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाला सभापती मधुकर गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, सरपंच बाळासाहेब भदाणे, निंबा आढावे, जिभाऊ माळी, शालीक विनायक पाटील,आधार माळीआबा भोई, दिलीप पाटील, एस.के.जैन उपस्थित होते.