बोरखेडा खुर्द येथील शेतकर्‍याचा सर्पदंशामुळे मृत्यू

कुटुंबीयांची वाट पाहणे शेतकर्‍याच्या जीवावर बेतले

यावल : तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील मुबारक दगडू तडवी (42) या शेतकर्‍याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची गुरुवारी घडली. सर्पदंशानंतर शेतकर्‍याला यावल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथे हलवण्यास सांगण्यात आले मात्र कुटुंबातील सदस्य आल्यावरच आपण जळगावला जावू, असा हट्ट शेतकर्‍याच्या जिवावर बेतणारा ठरला. कुटुंबीय येईपर्यंत प्रकृती खालावून जळगावला नेताना शेतकर्‍याचा रस्त्यातच मृत्यू झाला.