चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा गावाकडुन वाळुने भरलेले ३ ट्रॅक्टर तरवाडे गावाकडे येत असल्याची गोपनीय माहिती नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना मिळाल्यावरुन आज २३ रोजी सकाळी ६-३० ते ७-३० वाजेदरम्यान त्यांच्यासह पथकाने तरवाडे बोरखेडा रस्त्यावर तिन ट्रॅक्टर पकडले असुन ते चाळीसगाव पोलीस ग्राउंडवर जमा करण्यात आले आहेत. चाळीसगाव तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना आज २३ रोजी सकाळी मोबाईलवर माहिती मिळाली की बोरखेडा गावाकडुन तरवाडे गावाकडे तिन ट्रॅक्टर चोरटी वाळु घेवुन येत आहेत यावरुन नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी राहुल मंडलीक, सचिन मोरे, तलाठी बी ए चव्हाण, पी एस महाजन, प्रशांत कनकुरे यांनी सकाळी ६-३० ते ७-३० वाजेदरम्यान बोरखेडा तरवाडे रस्त्यावर एम एच १९ बी जी २३०५, एम एच १९ ए ७४९३ व एक विना नंबर एसे तीन वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे ट्रॅक्टर चाळीसगाव पोलीस ग्राउंडवर जमा करण्यात आले आहे सदर ट्रॅक्टर खरजई येथील दिपक साहेबराव चौधरी यांच्या मालकीचे असुन रहीपुरी येथील गणपती मंदीराजवळ केलेल्या वाळुच्या साठ्यावरुन वाळु भरुन आणली असल्याची माहिती नानासाहेब आगळे यांनी दिली असुन दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगीतले. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात व परीसरात कुठेही वाळुचा ठेका सुरु नाही तरी देखील मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळु चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे या कारवाई मुळे वाळु माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.