धरणगाव : नातेवाईकांकडे आलेल्या प्रौढाची चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव पोलिसात गुन्हा
अनिल रामदास निकम (45, हिरापूर, ता.चाळीसगाव) हे काही कारणास्तव धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे त्यांचे नातेवाईक महेश निंबा मराठे यांच्या घरी आले असता त्यांनी दुचाकी (एम.एच.19 एन.4428) त्यांच्या घरासमोर पार्क केली मात्र मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधत 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. धरणगाव पोलिसात मराठे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करीत आहेत.