रावेर- तालुक्यातील बोरघाटात 25 मेच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास पांगरेचे झाड आडवे टाकून दरोडेखोरांनी मारहाण करून धाक दाखवून तब्बल किमान तीन लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहजे. बोरघाटातील चोरवाला घाटा पुढे विही पॉईंटजवळ बारा ते पंधरा दरोडे खोरानी रात्रीच्या 10 वाजेच्या सुमारास वाहनधारकांना मारहाण करीत त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज लांबवला. सावद्याकडून येणार्या अमोल धनराज चव्हाण यांचे रोख दोन हजार 400 रुपये तसेच सोन्याचे ब्रासलेट, चारचाकीने येणार्या विकास खेमचंद चव्हाण यांच्याकडील 70 हजारांची रोकड तसेच विष्णू भोई यांचे 950 रुपये व एक कट्टा फुटाणे, धुळ्याकडून खरगोनला जाणार्या एका ट्रॅक चालकाला दगड मारून थांबवत त्याच्याकडील 32 हजारांची रोकड तसेच सुधाकर धांडे हे परीवारासह येत असल्याने त्यांच्याकडील 30 हजारांच्या रोकडसह 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज लांबवला. दरम्यान, 10 ते 15 संख्येने असलेले दरोडेखोर पावरी भाषा बोलत असल्याचे सांगण्यात आले.