बोरद । तळोदा तालुक्यातील बोरद येथील शहादा रस्त्यावरून नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहे. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून वारंवार मागणी करूनही रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नागरीका संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावर खड्डे झाले आहेत. तसेच साईडपट्टया देखील खराब झाल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करुन वाहने घेवून जावी लागत आहेत. सदर मार्गावर अपघात घडत असल्याने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाश्यांकडून होत आहे.बोरद गावाच्या पूर्व दिशेला शहादा रस्त्याला जोडणारा तसेच उत्तर दिशेला छोटा धनपूर, न्यूबन, लाखापूर, बन, करडे, मालदा, तुळाजे आदी गावांना जोडणारा बायपास रस्ता आहे.या रस्त्यावरुन शेतकरी अथवा विद्यार्थी दररोज ये-जा करतात. सदर रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढल्यामुळे समोरुन येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे अपघात घडत असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडल्याने वाहने चालवितांना कसरत करावी लागत आहे.