जळगाव । बोरनार येथील ग्रामस्थाची बकरी भिंतीला खेटते या कारणावरुन वाद होवुन दोघा शेजार्यांमध्ये लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना रविवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
बोरनार येथील रहिवासी अनील धनगर यांच्या मालकीच्या बकरीचा भिंतीला धक्का लागला, या कारणावरुन हिम्मत अर्जुन धनगर, अन्ना अर्जुन धनगर, सुनील धनगर, ज्ञानेश्वर धनगर यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवुन अनील त्याची आई व भाऊला मारहाण केली.