अश्विनी बोबडे यांच्यासाठी पद सोडले
पिंपरी : भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा हा नाराजीतून दिलेला नाही तर, अश्विनी बोबडे यांना विधी समितीवर संधी देण्यासाठी स्वखुशीने दिला असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. नुकताच वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी उघड झाल्याची चर्चा महापालिकेत होती. त्यावर पत्रकारांशी बोलून पक्षनेते पवार यांनी राजीनाम्यामागील सत्य सांगितले.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, अश्विनी बोबडे यांची विधी समितीवर निवड होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी क्रीडा समिती सदस्यपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. त्यात नगरसेवकांमध्ये सातत्याने राजीनामा सत्र सुरू आहे. त्यामुळेच वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा नाराजीतून हा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर पक्षाच्या सूचनेनुसार वसंत बोराटे यांनी स्वखुशीने विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी आश्विनी बोबडे यांची नियुक्ती विधी समितीवर केली जाणार आहे. पक्षार्तंगत तडजोडीतून हा राजीनामा दिला गेला, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे ते म्हणाले.