शिरपूर । चांगल्या आरोग्यासाठीच स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे व शिबिराच्या माध्यमातूनही आरोग्य सेवा दिली जात आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना सारख्या योजना महाराष्ट्र शासन जनतेसाठी राबवित आहे. या आरोग्य शिबिराचा जास्तीतजास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन भाजपाचे शिरपूर तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी याप्रसंगी केले. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत श्री.सिद्धेश्वर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल,धुळे मार्फत मोफत आरोग्य तपासणी व उपचाराच्या शिबीराचे आयोजन बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी नथ्थु नामदेव बडगुजर होते. तर उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले. यावेळी डॉ. मनोज निकम, डॉ. विजय पाटील, भागवत पवार, विजय देवरे, शशांक रंधे,अशोक महाजन,रविंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जिजाबराव पाटील, अर्जुन भिल,अंबादास सगरे, गणेश भामरे आदी उपस्थित होते.
मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत सेवा
निदान झालेल्या रूग्णांना योजनेच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात उत्कृष्ट प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून डॉ. संजय संघवी,डॉ. जितेंद्र ठाकुर , डॉ. नैनेश देसले डॉ. विलास रेलन, डॉ. हरीष मेहरा हे उपचार करणार आहेत. भाजपाचे तालुकाप्रभारी डॉ. जितेंद्र ठाकुर व भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. 245 रुग्णांनी याचा फायदा घेतला. याशिबिरात डॉ. सागर नेरकर,राकेश पाटील,अमृत ठाकुर,मुकेश ठाकरे,राजु जाधव,कैलास पाटील,डॉ. विजय पवार,बबन पाटील,अंकुश पाटील,रविंद्र पाटोळे यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार डॉ. जी.एच.पाटील यांनी मानले