शिरपूर । बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या माध्यमिक विद्यालयात जागतिक जलसंपत्ती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शाखाप्रमुख टी.टी.बडगुजर होते. उपशिक्षक गणेश भामरे , सी.एस.बडगुजर यांनी पाण्याचे स्त्रोत,पाण्याचे उपयोग आदींबाबत माहिती दिली. याप्रसंगी पर्यवेक्षक एस. आर. बडगुजर, सी.एम. कुलकर्णी, एन. एम. सोनवणे, टी. टी. ढोले, वैशाली पवार, बी. एन. ठाकरे ,जे. पी. पावरा, डी.जे. चव्हाण, एस. ए. अहिरे, सी. एस. बडगुजर, एन. एस. निकम उपस्थित होते.