बोराडीत योगदिन

0

शिरपूर । बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखाप्रमुख डी. ए. बोरसे होते. यावेळी उपशिक्षक सी.एस. बडगुजर यांनी विद्यार्थीनींना योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून सराव करवून घेतला व आरोग्याबाबत योगासनाचे महत्त्व सांगितले. यावेळी पर्यवेक्षक एस. आर. बडगुजर, सी.एम. कुलकर्णी, एन. एम. सोनवणे, जी. सी . भामरे, टी. टी. ढोले, वैशाली बोरसे, बी.एन, ठाकरे, धैर्यशील चव्हाण , संजय अहिरे, निरज निकम आदी उपस्थित होते.

कर्मवीर इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये योगदिवस
बोराडी येथील कर्मवीर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये जागतिक योगदिवस साजरा झाला. यावेळी योगासनचे प्रात्यक्षिक व सराव करण्यात आला. यावेळी शाळेचे समन्वयक जी. ओ. पाटील, प्राचार्य पल्लवी पवार, उपप्राचार्या सविता वाल्हे, ललीता पावरा, प्रकाश वाल्हे,रूपाली जाधव, गौरव चौधरी, देवेंद्र बडगुजर, निजामुद्दीन शहा, विजय धनगर, पावरा सर, एन. टी.मिस्तरी आदी उपस्थित होते.

हस्ती स्कूल येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा योगा
दोंडाईचा वि.प्र. हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूलअ‍ॅन्ड ज्यु.कॉलेज-दोंडाईचा येथे तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यु.कॉलेजप्राचार्य पराग पोळ यांनी योागाचे महत्व सांगितले. यात योगामुळे शरीराची निकोपवाढ व विकास होतो. तसेच मनाची एकाग्रता व स्मरणशक्तीवाढून; योग साधनेद्वारा नवनिर्मिती व आनंदीवृत्ती, समाधान, तणावमुक्त, प्रेम, क्षमा या गुणांचा विकास होतो. आणि निरामय आरोग्या सोबत ताण-तणाव इहीम जीवन जगण्यास सहाय्य होते.यासाठी दररोज नियमितपणे विविध योगासनांचा अभ्यास व सरावकरण्याचीआवश्यकताअसते असे सांगितले. यानंतर क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, योग शिक्षक प्रविण गुरव यांच्यामार्गदर्शनाने प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना, त्रिवार, ओमकार, सुर्यनमस्कार तसेच बैठक स्थितीतील उभ्या स्थितीतील, विपरीत शयनस्थिती व शयनस्थितीतील विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी ही योगासने केली. हस्ती स्कूलमध्ये दरवर्षी नियमितपणे दिनविशेषाअंतर्गत कार्यक्रमांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतेे.