बोराडी कृषि महाविद्यालयात कृषिदिन उत्साहात साजरा

0

बोराडी । के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय शाहदा येथील कृषिदुत बोराडी ता. शिरपुर येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन, वृक्षदिंडी व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन बोराडी येथील कृषिदुत व पंडित जवाहर लाल नेहरू विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले होते. के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी कृषिदुत म्हणून महाविद्यालयाच्या नियोजनाप्रमाणे विविध गावात दाखल झाले आहेत. बोराडी येथे पराग पवार, ऋषीकेश होशिंग, सचिन नायक, विल्येम केरी, सूर्यप्रकाश नायक, निलेश पाटील व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी मिळून कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षांची पूजा करून करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमेत वाजत गाजत संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली त्यांनतर शाळेच्या व सभोवतालच्या परिसरात वृक्षरोपां करण्यात आले. संस्थेचे शशांक रंधे यांनी झाडे लावण्याचा संदेश दिला.