बोराडी घाटात 5 लाखांची लुट

0

शिरपूर । तालुक्यातील बोराडी घाटात एका व्यापार्‍याला अज्ञात दरोङेखोरांनीचाकु चा धाक दाखवुन मारहाण करीत 5 लाख 30 हजार रुपये लुटून नेल्याची घटना दि.5 रोजी रात्री 8-30 वाजता घङली. सोनगीर वाघाङी येथील गोडेतेलाचे होलसेल व्यापारी सोनु चित्ते हे मोटारसायकलने मध्यप्रदेशातील पानसमल येथे वसुली साठी गेले होते. तेथुन बोराडी मार्गाने घराकडे परतत असतांना बोराडी घाटात अज्ञात 5 ते 6 दरोङेखोरानी त्यांना अडविले. त्यांना चाकुचा धाक दाखवत त्यांच्याजवळील वसुल करुन आणलेले 5 लाख 30 हजार रुपये लुटून नेले.