बोराडी घाटीतील दरोडा बनावच

0

शिरपूर । ‘साहेब,मला दरोडेखोरांनी जबर मारहाण केली माझ्याकडील साडेपाच लाख रूपये लुटून नेले आपण ताबडतोब बोराडी घाटाकडे यावे ’अशी आर्त हाक देणारा फोन सांगवी पोलिस स्टेशनला आल्याने संबंधित पोलिस यंत्रणा हादरली. क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी धाव घेतली. संबंधित व्यक्तीकडून सर्व माहिती जाणून घेत फिर्याद देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र संबंधितांवर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना पोलिस प्रशासनाच्या चाणाक्ष अशा नजरेतून फिर्याद देतांना केलेले कथन व सत्यस्थितीत मिळत असलेली माहिती यात असलेली तफावत यावरून खोलात गेल्यानंतर दरोडा हा पडलाच नसून संबंधित व्यक्तीने बनाव केल्याचे लक्षात आले.

व्यापार्‍याने कर्जबाजारीपणातून लढविली शक्कल
त्या व्यक्तीला हा गोडेतेलचा व्यापारी असून सोनगिर वाघाडी येथील रहिवाशी असल्याची माहिती त्यांने पोलिसांना दिली. त्याठिकाणी फिर्याद देण्याचा सोपस्कार पार पाडल्यानंतर चित्ते यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सपोनि खेडकर यांच्यातील अधिकारी जागृत झाल्याने त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे चित्ते यांच्याशी रूग्णालयात चर्चा केली. त्यावेळी दिलेली फिर्याद आणि सद्यस्थितीत मिळत असलेली माहिती यात तफावत आढळून आल्याने त्यांना संशय बळकावला. अत्यंत खोलवर जावून त्यांनी चित्ते यांना विश्‍वासात घेत खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यापारी हा गोडेतेलचा व्यापारी असून जास्त दराने कंपनीकडून माल खरेदी केल्यानंतर त्यात नुकसान आल्याने कर्जबाजारी झाल्यामुळे स्वत:च दरोड्याचा बनाव केल्याची कबूली चित्ते यांनी दिली. यामुळे पोलिस प्रशासनाने त्यांच्याकडून लेखी घेवून गुन्हा नोंदविण्याचे काम थांबविले. मात्र या घटनेवरून केवळ स्वत:वर कर्ज झाले म्हणून पोलिस प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम चित्ते यांच्याकडून झाले.

5 ते 6 दरोडेखोरांनी मारहाणीचा होता दावा
त्याच्याकडून लेखी घेतल्यानंतर पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्‍वास टाकला.मात्र यामुळे पोलिस यंत्रणा नाहक वेठीस धरली गेली. सोमवारी रात्री साधारण 9 वाजेच्या सुमारास सांगवी पोलिसांना सोनू चित्ते नामक व्यक्तीचा मोबाईल आला. संबंधित व्यक्तीकडून बोराडी घाटात आपल्याला 5 ते 6 दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून आपल्याकडील साडेपाच लाख रूपयांची रोकड लुटून नेत धारदार शस्त्राने हल्ला देखील झाल्याची माहिती देण्यात आली. तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक खेडकर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून जागेची पाहणी करत चित्ते यांना धीर देवून सांगवी पोलिस स्टेशनला आणले.

विसंगतीमुळे लक्षात आले….
व्यापारी चित्ते याने फिर्याद देतांना दिलेली माहिती व रू1/2णालयात दिलेली माहिती यात असलेली विसंगती यामुळे संशय बळावला त्यामुळे पोलिस प्रशासनातील शल्य वापरत त्याच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर सदर प्रकार घडलाच नसल्याचे निदर्शनास आले.
– किरणकुमार खेडकर
सपोनि सांगवी पोलिस स्टेशन.