शिरपूर । शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी तालुक्यातील बोराडी परिसरातील कार्यकर्त्यांसह वन विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून सलाईपाडा धरणाची पाहणी केली. सलाईपाडा धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु असल्याचे आ.काशिराम पावरा यांनी सांगितले. सलाईपाडा धरणाच्या कामासाठी पाठपुरावा केले जाईल असे सांगून अजून लक्ष घालून जोमाने कामे केली जातील असे यावेळी आ.काशिराम पावरा यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले. वनविभागाच्या अधिकारी यांना सोबत घेवून या कामाचा प्रस्तावाबाबत चर्चा झाली. त्यांच्या समवेत बोराडी येथील माजी जि.प. सदस्य् रणजितसिंग पावरा, राजू सूर्यवंशी, जगदीश पावरा, विश्वनाथ कुवर, देवा पावरा, चिमाजी पावरा, कैलास बाफना, रविंद्र देवरे, निलेश महाजन, भुपेशभाई युवा सर्कलचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.