शिरपूर । संतुलित आहार, स्वच्छता, नियमित व्यायाम, मैदानी खेळ यामुळे आपले शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम राहते म्हणून आपण वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन निता ताजी यांनी केले. बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात नुकतीच विद्यार्थीनींची वैयक्तिक आरोग्य तपासणी संपन्न झाली. यावेळी विद्यार्थीनींना येणार्या शारिरीक, मानसिक समस्या, आहार, मैदानी खेळ, व्यायामाचे आरोग्यासंदर्भात महत्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
धनुर्वातचा डोस यावेळी धनुर्वातचा डोस देण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.आर.बडगुजर, रोहिणी रंधे, आरोग्य परिचारिका आर.बी.पावरा, वैशाली पवार, ज्योती पावरा, भानुमती ठाकरे, चंद्रकांत बडगुजर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गणेश भामरे यांनी केले.