यावल : तालुक्यातील बोरावल येथील 30 वर्षीय तरुणाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरुणाची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
संतापात प्राशन केले तणनाशक
बोरावल येथील किरण नामदेव पाटील (30) या तरुणाने संतापाच्या भरात तणनाशक विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ.अमीन तडवी, अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, अधिपरीचारीका जॉन्सन सोरटे, बापू महाजन, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तरुणाची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.