यावल : तालुक्यातील बोरावल खुर्द येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झन्ना-मन्ना हा जुगाराचा डाव सुरू असतांना यावलचे पोलिस पथक छापा टाकण्यास गेले असता छाप्यात पकडलेल्या इसमांना आताच्या आताच सोडा अन्यथा पोलिस पथकास येथून जावू देणार नसल्याची खेमचंद बाळकृष्ण वारुळकर याने धमकी देत पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी संशयीतांविरोधात यावल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा
बोरावल खुर्द येथे शांताराम दशरथ धनगर यांच्या घराशेजारील सार्वजनीक ठिकाणी बुधवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास झन्ना-मन्ना हा पत्त्यांचा खेळ सुरू असल्याच्या माहितीवरून फौजदार विनोद खांडबहाले सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलिस अंमलदार सुशील घुगे, भुषण चव्हाण, राजेश वाढे, दिलेश वाघ व गृहरक्षक दलाचे पंकज कोळी हे गेले असता खेमचंद बाळकृष्ण वारुळकर यांनी पथकास मला व अन्य पकडलेल्या इसमांना आताच सोडून द्या, अन्यथा तुम्हास येथून जावू देणार नाही, अशी धमकी देत पथकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी असलम खान दिलदार खान यांच्या फिर्यादीवरून वारुळकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.