बोरावल खुर्दला महिलेची आत्महत्या

0
यावल : तालुक्यातील बोरावल खुर्द येथे 48 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी अडीच वाजेपूर्वी ही घटना घडली. नैनाबाई सोपान बारेला (48, बोरावल खुर्द) असे मयत महिलेचे नाव आहे.
बोरावल खुर्द शिवारातील शांताराम दशरथ धनगर यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडास ठिबक सिंचनच्या प्लॅस्टीक नळीने बांधून घेऊन या महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलीस पाटील किरण मधुकर पाटील यांनी यावल पोलिसात खबर दिली. तपास हवालदार राजेंद्र पाटील करीत आहेत.