यावल। तालुक्यातील बोरावल खुर्द गावाजवळील पुलाचे बांधकाम निकृष्ठ साहित्य वापरुन केले जात आहे. या कामाची गुणवत्ता नसल्यानेे ते थांबविण्यात येऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी रिपाई आठवले गटातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले आहे.
बांधकाम विभागास निवेदन
या कामात मातीमिश्रीत रेती, तसेच स्टील योग्य कंपनीचे नाही, धुळीचा वापर करणे, सिमेंट अतिशय हलक्या प्रतीचे वापरत असून कामाच्या ठिकाणी काम कुठल्या योजनेतून मंजूर असून खर्च किती कालावधी किती असा कुठलाही दिशादर्शक फलक नाही. कामासाठी नाल्याचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे ठेकेदार मनमानीपणे काम करीत असल्याचा आरोप रिपाइंतर्फे करण्यात आला आहे. निकृष्ठ कामामुळे गावकरी तसेच वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून गावकर्यांनी बंद पाडले आहे. या कामाची जलद चौकशी होवून ठेकेदाराचा परवाना रद्द होवून काळ्या यादीत समाविष्ठ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अशोक तायडे, भिमराव वाघ, मधुकर पाटील, संजय ठोंबरे, पवन सोनवणे, विशाल तायडे, दिपक सोनवणे, संजय तायडे, विनोद तायडे, किरण तायडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.