अमळनेर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी झुंबड होऊ नये यासाठी बोरी नदीत तामसवाडी धरणाचे व पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातुन पाणी सोडुन येत्या महिन्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी गंगाधरण यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर जळगाव जिल्हापरिषदने आवर्तन मागणीचा प्रस्ताव पाठवला असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील यांनी माहिती दिली आहे. तर जळगाव जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना बोरी धरणाबाबत देखील मागणी केली असून त्याबाबत लवकर निर्णय होणार आहे अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
अक्कलपाडा धरणामुळे अमळनेर तालुक्यातील ४० ते ४५ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये आहे. यासाठी ही मागणी केली असून लवकरच धरणाचे पाणी सोडले जाईल.
यावर्षी अक्कलपाडा फुल झाल्यानंतर पाणी सोडल्याने फरशी टंचाई जाणवली नाही. तरीही मार्च महिन्यात पांझरा नदीपात्र कोरडेठाक झाले असल्याने असंख्य गावांच्या पिण्याच्या पाण्य