बोरी नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा

0

अमळनेर । बोरी नदीवरील पैलाड ते कसाली मोहल्ला या भागाला जोडणार्‍या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवार 6 रोजी पार पडला. या पुलाचे निर्माण 7 कोटी 50 लाख रूपये खर्च करून आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून झाले आहे. या पुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात आले आहे. या पुल लोकार्पण प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, प्रा अशोक पवार, उदय नंदकिशोर पाटील, सलीम टोपी, श्रीराम चौधरी, नरेंद्र चौधरी, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विकास वाघ, श्याम संदानशिव, योगराज संदानशिव, भाऊसाहेब महाजन, दादा पवार, कॉन्ट्रॅक्टर बी आर भदाणे, संतोष लोहरे, फिरोज मिस्तरी, राहुल गरुड, गुलाम नबी, नरेश कांबळे, पांडुरंग महाजन, अनिल महाजन, सुरेश सोनवणे, राजेंद्र पाटील, आनंदसिंग पाटील, राजीव पाटील, दीपक चौगुले, सोपान लोहार, कांतीलाल गरुड, प्रताप पाळधी, भगवान वाघ, पंकज चौधरी, किरण बागुल आदी उपस्थित होते.