बोर-घाटात माल वाहतुकीची वाहने उलटल्याने एक जण गंभीर

0

पालजवळ अपघात ; चार प्रवासी जखमी

रावेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाल येथे बाजारासाठी जाणारी मालवाहतूक गाडी बोर घाटात पलटी झाल्याने एक जण गंभीर तर सुमारे चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. मंगळवारी पालचा बाजार असल्याने भाजीपाला विक्रीसाठी माल वाहतूक गाड़ी सावद्याकडून पाल जात होत. वाहन बोरघाटाजवळ येताच उलटले. सावदा पोलिस व पाल आऊट पोस्ट इन्चार्ज पोलिस उपनिरीक्षक कैलास पाटील यांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारार्थ सावदा येथे हलवण्यात आले.