बोर घाटात वाहनधारकांमध्ये हाणामारी

पालजवळील बोरघाटातील घटना : पोलीस दाखल होण्यापूर्वीच वाहनधारकांनी घडवला समेट : अज्ञाताने कळवली माहिती

रावेर : वाहने ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून पालच्या बोरघाटात हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी घडली. घटनेची माहिती मिळताच सावदा सहा.पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले व पालचे फौजदार राजेंद्र राठोड घटनास्थळी दाखल झाले मात्र दोन्ही वाहन चालकांनी आपसात तडजोड केल्यानंतर घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

टोल फ्री क्रमांकावर रस्ता लुटीची माहिती
पोलिसांना बोरघाटात रस्तालूट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सावदा व पाल पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र प्रत्यक्षात रस्तालूट झाली नसून वाहनांच्या ओव्हरटेकवरून हाणामारी झाल्याचे कळाले शिवाय दोन्ही वाहने परराज्यातील असल्याचे सांगण्यात आले. अज्ञाताने टोल फ्री क्रमांक 112 वर कॉल करून रस्तालूट झाल्याची माहिती दिल्यानंतर सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले तसेच पालचे फौजदार राजेंद्र राठोड आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाले मात्र वाहनधारकांनी आपसात समेट घडवल्याने दोन्ही घटनास्थळी नसल्याने पोलिसांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला.