In Yawal, strangers engaged in talking and extended the mobile phone यावल : शहरातील मरीमाता मंदिराजवळ एक महिलेसह अज्ञात इसमाने बोलण्यात गुंतवून एकाचा मोबाईल लंपास केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी यावल पोलिसात अनोळखी महिलेसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बोलण्यात गुंतवत लांबवला मोबाईल
यावल शहरातील मरीमाता मंदिराजवळ सोमा धोंडू राऊत हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे दोन हजार रुपये किंमतीचा जिओचा मोबाईल होता व ते घराजवळ बसले असताना त्यांच्याजवळ एक अनोळखी महिला आणि एक इसम आले. त्यांच्याशी बोलत असतांना त्यांना गोष्टीत गुंतवून ठेवून त्यांचा मोबाईल अलगद लांबवला. हा प्रकार दोघे निघून गेल्यानंतर लक्षात आल्यानंतर सोमा राऊत यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.