चाळीसगाव । चाळीसगाव-धुळे रोडवरील नगरपालिका समोर बोलेरो आणि मोटारसायकच्या धडकेत दोन तरूण जागीच ठार झाल्याचा घटना 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. चाळीसगाव-धुळे रोडवरील नगरपालिका समोर देराबर्डी येथील रोडवर धुळ्याकडून चाळीसगावकडे जाणार्या बोलेरो क्र.(एमएच 19 बीएम 2117) ने समोरून येणार्या मोटारसायकल क्र.(एमएच 19 बीए 2774)ला समोरून धडक दिल्याने देराबर्डी येथील केदार रामेश्वर महाले (वय-20) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या अर्जून कचरू चव्हाण (वय-22) याला उपचारासाठी धुळे येथे घेवून जात असतांना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत होते.