जळगाव । नशिराबाद गावाच्या गोदावरी हॉस्पीटलजवळ राष्ट्रीय महामार्गावर गोदावरीकडून भुसावळकडे जाणार्या प्रवाशी रिक्षाला मागुन येणार्या भरधाव वेगाने येणार्या अज्ञात बोलेरोने जोरदार धडक दिल्याने रिक्षा पटली झाली. आपघातात पत्नी जागीच ठार तर पती उपचारादरम्यान मृत्यू झाले. तसेच इतर आठ जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली असून नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फैजपूरजवळील मधुकर साखर कारखान्यात कामाला असलेले सुभाष सिताराम चौधरी (वय-50) रा. थोरगव्हाण ता.रावेर ह.मु. यावल यांना काही दिवसांपासून तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे ते आपल्या पत्नी प्रमाबाई सुभाष चौधरी (वय-44) सह नशिराबादजवळील गोदावरी हॉस्पिटलमध्ये आले होते. वैद्यकिय तपासणी केल्यानंतर ते पुन्हा यावलला जाण्यासाठी गोदावरी हॉस्पिटलपासून प्रवाशी रिक्षाने बसले. यावेळी प्रवाशी रिक्षामध्ये इतरही प्रवाशी भुसावळकडे जाण्यासाठी बसलेले होते. गोदावरी हॉस्पिटलच्या पुढे असलेल्या वळणावर दुपारी 2.30 वाजता मागुन येणार्या भरधाव वेगाने येणार्या अज्ञात बोलेरोने जोरदार धडक दिल्याने रिक्षा पटली झाली. यात प्रमाबाई चौधरी ह्या जागीच ठार झाल्या तर सुभाष चौधरी यांच्यासह रिक्षात बसलेले आठ प्रवाशी जखमी झाले. जखमींना गोदावरी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यात सुभाष चौधरी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. थोरगव्हाण या गावाला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.