बोहरा समाजाशी माझे नाते जुने-नरेंद्र मोदी

0

इंदुर – बोहरा समाजाशी माझे जुने नाते आहे. मी एक प्रकारे या समाजाचा भागच झालो आहे. तुमच्या कुटुंबासाठी माझे दार आजही खुले आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी बोहरा समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आशरा मुबारका या इमाम हुसैन यांच्या स्मरणोत्सव कार्यक्रमात ते यावेळी सहभागी झाले.

मध्यप्रदेश दौऱ्यावर मोदींनी दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी मशिदीलाही भेट दिली. यावेळी बोहरा समाजाचे धर्मगुरू सईदाना मुफद्दल सैफुद्दीन यांनी मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या आगावू शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे. यापूर्वी ते कधीही बोहरा समाजाच्या मशिदीमध्ये गेले नव्हते. २०११ च्या सद्भावना कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी मुस्लिमांची टोपी घालायचे टाळले होते. आता मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यावरुन मोदी मतांचे राजकारण करत आहेत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.