15 दिवसांत समस्या न सुटल्यास पुन्हा आंदोलन
भुसावळ- बोहर्डी बुद्रूक गावात बससेवा नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असल्याने गावात बस सेवा सुुरू करण्याच्या मागणीसाठी पीपल्स रीपब्लिकन पार्टीतर्फे सोमवारी सकाळी सात वाजता महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. जगन सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. आगामी 15 दिवसात गावात बस सुरू न झाल्यास गावात बसफोडो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोहर्डी बुद्रूक गाव असूनही गावात बस येत नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यामुळे महामंडळाने बस सेवा सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वरणगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.