भुसावळ- भुसावळचे नगरसेवक रमेश नागराणी यांच्या भुसावळ-मुक्ताईनगर महमार्गावर बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोलियम पंपावर दुचाकीवरून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील अनोळखी दरोडेखोरांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करीत कपाटातील दोन लाख 45 हजारांची रोकड, दहा हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही रेकॉर्ड करण्याचे डीव्हीआर व चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून दोन लाख 59 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली होती.
या घटनेचे मध्यप्रदेश कनेक्शन असून वरणगाव पोलिसांतर्फे एक-दोन दिवसात आरोपींचे स्केच जारी करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदेशी परदेशी यांनी ‘दैनिक जनशक्ती‘ला दिली.