बौद्धकालीन शिल्प अन् नाणी प्रदर्शनातून वरणगावकरांना ऐतिहासीक अनुभूती

0

वरणगाव- तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीची प्राचीन नाणी, शिक्के जवळून पाहून त्यासोबत जोडलेल्या संपन्न व वैभवशाली संस्कृतीची माहिती घेताना वरणगावकरांना दोन दिवस ऐतिहासिक अनुभूती मिळाली. निमित्त होते बौद्धकालीन शिल्प-नाणे प्रदर्शनाचे. वरणगावातील वामन नगरात आयोजित प्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेट दिली. त्यात बोधी वृक्ष, मोर्यकालीन, सम्राट अशोककालीन शिक्के नाणी व नाणी पाहताना अनेक जण हरखून गेले. मंगळवारी दुपारी दोन वाजता या प्रदर्शनाचा समारोप झाला.

यांची होती उपस्थिती
सहायक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे, रमाबाई भालेराव, मध्य प्रदेशातील महिदपूर येथील अश्विनी शोध संस्थेचे डॉ.आर.सी. ठाकूर, नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेविका माला मेढे, अरुणा इंगळे, मिलिंद मेढे, महेंद्र तायडे, डॉ.देवानंद उबाळे उपस्थित होते. भंते सुमेधबोधी महाथेरो यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर डॉ.ठाकूर यांनी, भारताच्या इतिहासात नाणी म्हटली की, बौद्धकाळ डोळ्यांसमोर येतो. कारण या जम्बुद्वीपात सांस्कृतिक बौध्द कलाविष्कार उदयास आला. सम्राट कनिष्कच्या काळात चलन नाणे रूपात सुरू झाले. प्रथम ‘व्हील ऑफ द लॉ’ किंवा धर्मचक्र, स्वतः राजाची अशी सोन्याची नाणी देशात प्रथमतः आली. यानंतर नाणे युगात चलन सुरू झाले. त्रिरत्नाचे सिंह चलन देशात प्रचलित झाले असे सांगितले. मधूर इंगळे, मोहन मोरे, देविदास मोरे, राजाराम बोदडे, बक्षी मोरे, प्रताप बोदडे, रतन मोरे, के.सी.इंगळे, चंद्रशेखर तायडे, सुरेश सुरवाडे, संजना तायडे, कमल इंगळे, सुनंदा मोरे, अलका मोरे, बंगताबाई सुरवाडे, लता तायडे यांनी सहकार्य केले.