बौद्धविहाराच्या जागेसाठी जिल्हाधिकार्‍यांना साकडे

0

धुळे । शिंदखेडा येथील सिद्धार्थ नगराशेजारील गावठाण गट न 1215/1-1अमधून 0.21 क्षेत्रफळ जागा तात्कालीन ग्रामपंचायतीने फळझाड लागवडीसाठी गमीर खा झिपरू खा पठाण वै यांना दिली होती. परंतु, या जागेवर सध्या एकही फळझाड शिल्लक नाही. यामुळे ही शर्तपूर्ण रद्द झाल्याने ही जागा बुद्धविहारासाठी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सध्याच्या शिंदखेडा नगर पंचायतीला यातून उत्पन्न मिळत नसून आज ही जागा पठाण यांच्या ताब्यात आहे. उतार्‍यावर ते क्षेत्र सरकारी गट दिसून येत असून जागेलगत मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज बांधवांचा रहिवास आहे. ही जागा बौद्धविहारासाठी देण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना 9 मार्च 2017 रोजी निवेदन दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने ती जागा बौद्धविहारासाठी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.