पुणे : ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून तब्बल 12 लाख 69 हजार रुपये किंमतीचे 255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.
अशोक अर्जुन जाधव (वय 34, रा. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे. अशोक हा शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून इंदिरानगर येथील झोपडपट्टीमध्ये अशोकला अटक करण्यात आली व त्याच्याकडून 12 लाख 69 हजार रुपयांचे 255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपआयुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.