ब्राझिलमध्ये पासपोर्टवर स्थगिती

0

अर्थसंकल्पात तूट आल्यामुळे ब्राजीलमधील अधिकार्‍यांनी थेट पासपोर्ट देण्यावर अंतरिम स्थगिती आणली आहे. सर्वसाधारणपणे पासपोर्टचा अर्ज प्राप्त होताच पुढील 6 दिवसांत पासपोर्ट दिला जातो, मात्र मंगळवारपासून पासपोर्टचे अर्ज स्वीकारणे थांबवण्यात आले आहे. अर्थसंकल्पात तूट आल्यामुळे देशातील पैसा नाहक परदेशात कुठे जाऊ नये, म्हणून ब्राझिल सरकारने पासपोर्ट देण्यावर स्थगिती आणून लोकांचे परदेश भ्रमण थांबवले आहे. यासाठी ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमेअर यांच्यावर या संकटाची जबाबदारी सोपवण्यात आली. देश सध्या या दशकात आर्थिक टंचाईतून जात आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या सप्ताहात संसदेत होणार्‍या चर्चेत यासंबंधीचे विधेयक मांडण्यात येणार आहे, जेणे करून यात तातडीने सुधारणा करणे शक्य होईल.