चाळीसगाव : तालुक्यातील – ब्राम्हणशेवगे येथे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन ग्रामपंचायत व जि.प. प्राथमिक शाळेमार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच आशा माळी यांच्याहस्ते तर जि.प.प्रा.शाळेचे ध्वजारोहण नागो राठोड यांचे हस्ते करण्यात आले. नंतर ग्रा.पं. मार्फत ग्रामसभा सरपंच आशा माळी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सुत्रसंचालन ग्रामसेवक शाम पाटील व उगले सर यांनी केले.
याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चा प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, ग्रा.पं.सदस्य शांताराम नेरकर,माजी सरपंच दत्तात्रय पवार, मदन राठोड, न्यानेश्वर राठोड, आर.के.राठोड (सेवानिव्रुत डी.वाय.एस.पी.), पो.पाटील राजेंद्र माळी, सरपंचा यांचे पती नाना माळी, माजी सरपंच पती प्रकाश नेरकर, विजय भास्कर पवार, तलाठी सौ.सोनवणे, दादाभाऊ बाविस्कर, दिगंबर दिनकर मोरे, शालेय व्यवस्थापणचे तुपे, सुभाष बाविस्कर, संजय बाविस्कर, रत्नाकर पाटील, प्रमोद देसले, जि.प. प्राथमिक शाळा मु. श्री.अहिरे शिक्षक, प्रा.आरोग्य उप केंद्राचे खैरनार, सौ.बने, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रा.पं.शिपाई व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.