ब्राम्हणशेवगे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0

चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे दरवर्षीप्रमाणे 28 जुलै ते शुक्रवार 4 ऑगस्ट 2017 या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे बारावे वर्ष असून गावातील हनुमान मंदीर परीसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4:30 ते 5:00 गावातून प्रभातफेरी, स.5:00ते 6:00 काकड आरती, स. 8:30 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 ज्ञानेश्वरी पारायण, संध्या. 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 किर्तन असणार आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा याप्रमाणे
किर्तनकार ह.भ.प.दत्तात्रय महाराज(वावडेकर) यांचे 28 जुलै 2017, हभप अतुल महाराज(नारणेकर)यांचे 29 जुलै 2017, हभप प्रतिभाताई महाराज(सोनगिर) यांचे 30 जुलै 2017, हभप महादेव महाराज(आघारकर) यांचे 31 जुलै 2017, हभप पंकज महाराज(आघारकर) यांचे 1 ऑगस्ट 2017, हभप रविंद्र महाराज (तारखेडे) यांचे 2 ऑगस्ट 2017, हभप सतिलाल महाराज(म्हसदीकर) यांचे 3 ऑगस्ट 2017, हभप ज्ञानेश्वर महाराज(बेलदारवाडी) यांचे 4 ऑगस्ट 2017 सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन होणार आहे. पालखी सोहळा 3 ऑगस्ट रोजी तर महाप्रसाद 4 ऑगस्ट रोजी वैकुंठवाशी हभप विक्रमनाना महाराज यांच्या स्मरणार्थ डाँ.प्रशांत विश्वनाथ पवार यांचेकडुन देण्यात येणार आहे. तरी या सुवर्ण धार्मिक संधीचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे ब्राम्हणशेवगे पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी आवाहन केले आहे.