चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे राष्ट्रीय काँंग्रेस पार्टीतर्फे भारत भर माझी कर्जमुक्ती झाली नाही या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी संपर्क साधला जात आहे. याचाच भाग म्हणुन शुक्रवारी 21 रोजी कॉग्रेसतर्फे कर्जमुक्ती अभियान राबविण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांनी चाळीसगाव ब्लॉक येथे ब्राम्हण शेवगे गावी शेतकरी कर्ज माफी संदर्भात शेतकरी व कार्यकर्त्यांशी सवांद साधला.
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल निकम, शहर अध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, अशोक खलाने, सुरेश पाटील, अजबराव पाटील, राहुल मोरे, रमेश शिंपी, ए.व्ही.पाटील, प्रा .एम. एम. पाटील, जगराम राठोड, मदन राठोड, विजय पवार, नाना माळी, हेमंत पवार, राजेंद्र बाविस्कर, अँड.वाडीलाल चव्हाण, राहूल पाटील, प्रविण माळी, पद्माकर बाविस्कर यांच्या समवेत असंख्य शेतकरी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड.शिवाजी बाविस्कर, प्रास्ताविक अनिल निकम तर आभार लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी मानले. यावेळी अॅड.संदीप पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याभरात याबाबत फाँर्म भरुन घेतले जात आहेत. अधिवेशनात सदर फाँर्म सरकारला दाखवली जाणार आहेत.