ब्राम्हणशेवगे येथे जलयुक्तच्या कामांस प्रारंभ

0

चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील बर्‍याच शेतकरी बांधवांच्या शेतजमीनी महसुली दप्तरी शेवरी शिवारात असुन हे शेतकरी मात्र शिवार फेर्‍या अडकले होते. कारण जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माळशेवगे गावात तयार करण्यात आलेल्या सन 2015-2016 आराखड्यात शेवरी शिवारात सिमेंट नाल्याचे बांध नसल्याने शिवारातील कामे घेतलेली नव्हती त्यामुळे शिवारातील शेतकरी या योजनेपासुन वंचित होती. योजनेत 2016-2017 या वर्षी ब्राम्हणशेवगे गावाचा समावेश झाल्यामुळे सध्या ब्राम्हणशेवगे शिवारात सदर कामे सुरु असल्यामुळे ब्राम्हणशेवगे येथे राहत असलेले पण शेवरी शिवारात शेतजमिनी असलेले शेतकरी वारंवार शासनाकडे तगादा लावत होते.

याची कृषी विभागाने दखल घेत या शिवारातील माती नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरणाच्या कामांना सुरुवात केली असल्यामुळे या शिवारातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ब्राम्हणशेवगे व शेवरी शिवारातील प्रस्तावित सिंमेंट नाला बांधकामे त्वरीत मंजूर व्हावीत अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, शेतकरी कामगार बचाव संघटनेचेे तालुकाअध्यक्ष रत्नाकर पाटील, ज्ञानेश्वर राठोड, मदन राठोड, मच्छिंद्र निकम साहेब, रमेश निकम, राजेंद्र माळी, राजकुमार चव्हाण, मोरसिंग चव्हाण, कैलास राठोड यांनी केली आहे.