ब्राम्हणशेवगे येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

0

गावातून वाजत गाजत पालखीची काढली मिरवणूक

चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे संत सेवालाल महाराज यांची 279वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात नाईकनगर, नाईकनगर तांडा नं.2, कृष्णवाडी या तीन्ही तांड्यांनी एकत्र येत जयंती साजरी केल्याने परिसरात चर्चेला व राजकिय समिकरण बदलाबाबत तर्कवितर्क लावण्यात येतांना दिसत होते. गावातून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आल्याने बंजारा समाजाच्या जुण्या जाणकारांनी समाधान व्यक्त केले. लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून मागील वर्षापासून फक्त महाराजांच्या प्रतिमा पुजनाने जयंती उत्साहास सुरवात करण्यात आली होती. यावर्षी युवकांनी व तिनही तांड्यांनी उस्पुर्त प्रतिसाद दिल्याने दिवसभर बंजारा समाजाची गाणी, युवकांनी नाचत गात जल्लोष करत व गोड- धोड प्रसादाचा भोग देत जयंती साजरी करण्यात आली. मिरवणूकीनंतर नाईकनगर येथील विठ्ठल-रुख्माई मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी चाळीगाव बस आगाराचे आगार प्रमुख संदिप निकम, जळगावचे सातपुते, चंकीपांडे, बंजारा समाजाचे ओंकार जाधव, बळीराम पवार (पहेलवान), जगराम मानसिंग राठोड, मदन राठोड, लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, रत्नाकर पाटील, बद्रीनाथ राठोड, विष्णू राठोड, चरणदास चव्हाण, अ‍ॅड.वाडीलाल राठोड, गायक गणेश राठोड, सुरसिंग राठोड, पोपट राठोड, किशोर राठोड, तसेच प्रतिक्षा व प्रसाद राठोड व मोठ्या संख्खेने बंजारा समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सत्रसंचलन मा.सरपंच ज्ञानेश्‍वर राठोड तर आभार जगराम राठोड यांनी मानले.