चाळीसगाव । कडक उन्हाचा फटका जंगली प्राण्यांनाही बसत असुन 23 एप्रिल रोजी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील संजय दिनकर बाविस्कर यांच्या विहीरीत नर जातीचे हरीण सायंकाळी पडले असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांना याबाबत माहीती दिली. परंतु विहीरीत 20 ते 25 फुट पाणी असल्यामुळे सदर हरीण मृत पावले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी प्रयत्न करुनही हरीण विहीरीत जास्त पाणी असल्यामुळे मृत पावले.
ब्राम्हणशेवगे, हिरापुर, शेवरी परिसरात ब-याच दिवसांपासुन हरणांचा कळप आहे. सध्या परिसरातील तलाव कोरडे झाल्यामुळे हरीण तसेच जंगली प्राणी, पक्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करतांना दिसतांत. या प्राण्यांना कुत्रेही त्रास देतात. वनविभागाने सदर परिसरात जंगली प्राणी, पक्षी यांना काही उपाय योजना कराव्यात तसेच पिण्यासाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी प्राणी मित्रांकडुन होत आहे.