कुटुंब लग्नाला गेल्याची संधी ; घरफोडीने खळबळ
शहादा- तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथील भरत मदन पाटील हे सोमवारी कुटुंबासह लग्नाला गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 25 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. दुपारी एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लांबवली. धाडसी घरफोडीनंतर घटनास्थळी पोलिसांसह श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी धाव घेतली. या घरफोडीत सुमारे 25 लाखाचा मुद्देमाला चोरीला गेल्याचा प्रथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.