ब्राह्मणशेवगे बससेवा सुरळीत करण्याची मागणी

0

चाळीसगाव। तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथी बस सेवा पुर्ववत करावी अन्यथा लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा चाळीसगाव बस आगाराला देण्यात आला आहे. तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील बस सेवा गेली काही दिवसापासुन बस आगाराच्या मनलहरी कारभारात पटेल तेव्हा फेरी बंद करणे, हिरापुर ऐवजी डोण मार्गे वळवणे, कोणती गाडी कोणत्या मार्गाने व कधी याचा भरवसा नाही. यामुळे प्रवाशी व विद्यार्थी संभ्रमात असतात. अशा प्रकारामुळे खाजगी वाहतुक धारकांचे तर फावत आहेच पण बस सेवेला ही आर्थिक नुकसान होत आहे. असा प्रकार दिवसातुन चार बस फेर्‍यांच्या संदर्भात होत आहे.

मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बसच्या अवेळी वेळामुळे अनेक वेळा वेळेवर टपाल ग्रामस्थांना मिळत नाही व त्याचा रोष ओढुन घ्यावा लागतो व नाहक मनस्ताप पोस्टमनलाही सहन करावा लागतो. असाच प्रकार दुपार व सायंकाळच्या बस फेरींचा झाला असल्यामुळे प्रवाशी पुर्णता वैतागल्यामुळे मागच्या वर्षी हा मनमानी प्रकार थांबवावा व बस फेर्‍या सुरळीत कराव्यात यासाठी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी व प्रवाशांनी 19 फेब्रुवारी 2016 रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर चाळीसगाव आगार व्यवस्थापक यांनी 17 फेब्रुवारी 2016 रोजी पत्र देऊन सर्व मागण्या मान्य करुन बस फेर्‍या हिरापुर मार्गे पुर्ववत करण्याचे व आंदोलन न करण्याची विनंती केली होती . यामुळे आंदोलन थांबले होते. परंतु काही दिवसापासुन पुन्हा तोच प्रकार आगारामार्फत सुरु असुन त्वरीत सदर बस फेर्‍या पुर्ववत सुरु कराव्यात अन्यथा पुन्हा लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून तिव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या परिणामास बस आगार सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा सोमनाथ माळी, मदन राठोड, रत्नाकर पाटील, ज्ञानेश्वर राठोड, सुभाष बाविस्कर, संजय बाविस्कर, विष्णु राठोड, नाना पाटील व प्रवाशांनी दिला आहे.