चाळीसगाव । तालुक्यातील रोहीणी, अंधारी, हिरापुर, माळशेवगे, ब्राम्हणशेवगे, डोण, ओझर, पातोंडा, वाघळी, हिंगोणा, वडाळा/वडाळी या गावातून पदयात्रा जाणार असून ब्राम्हणशेवगे येथे या पदयात्रेचा मुक्काम असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 3 जुलै रोजी ब्राम्हणशेवगे येथे या पदयात्रेचा मुक्काम असुन विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री गोविंद पदयात्रा 23 जून पासुन नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या लौकी येथून निघाली असुन 19 दिवसाचा प्रवास करुन 11 जुलै रोजी पारोळा तालुक्यातील कनाशी-चोरवड येथे पोहोचणार आहे. पदयात्रेचे मार्गदर्शक किर्तनकार ह.भ.प. हरिराजबाबा घुगे , ह.भ.प.उत्तमराज जामोदेकर (कानळद), ह.भ.प. महेंद्रमुनी लांडगे हे करीत आहे. पदयात्रेचे व्यवस्थापन दत्तू सोनवणे, गोविंदप्रभु सेवाभावी संस्था करत आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रमस्थातर्फे करण्यात आले आहे.