ब्राह्मणशेवगे हागणदारी मुक्तीच्या वाटेवर

0

चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे गावाची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून 27 रोजी स्वच्छ भारत अभियान समुदाय संचलित हागणदारी निर्मुलन कृती आराखडा नियोजन करण्यात आले आहे. यशदा पुणे येथील मास्टर ट्रेनर भुषण लाडवंजारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रांगोळी द्वारे नकाशा काढुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संपुर्ण गावात सांडपाणी व्यवस्थापण करण्यासाठी अंडर ग्राउंड गटार बनवणे, नादुुरुस्थ गटारी दुरुस्थ करणे, शोष खड्डे तयार करण्याच्या कामांचा तसेच शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, याप्रसंगी सरपंच आशा माळी, ग्रामविस्तार अधिकारी दिलीप अहिरे, उपसरपंच सोनाली पाटील, शांताराम नेरकर, नामदेव मोरे, सोमनाथ माळी, रत्नाकर पाटील, ज्ञानेश्वर राठोड, राजेंद्र माळी, बाळासाहेब बाविस्कर, मनोज करोडपती, जे.एम.बाविस्कर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.