‘ब्राह्मणांचे मुलं शहीद होत नाही’ या विधानावरून राजू शेट्टीने मागितली माफी !

0

कोल्हापूर- देशासाठी देशपांडे, कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत, शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात असे वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत होती. ब्राह्मण समाजातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान त्यांनी या विधानावरून जाहीर माफी मागितली आहे. शहिदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या विधानामुळे राजू शेट्टींविरोधात कोल्हापुरमध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती.