ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत विविध आघाड्यांची स्थापना

0

एरंडोल। तालुक्यातील ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक गणपती मंदिर येथे उत्साहात पार पडली. ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जोशी अध्यक्षस्थानी होते. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जोशी, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कुलकर्णी, पुरोहित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शुक्ल, महिला आघाडीच्या हेमलता जोशी प्रमुख पाहुणे होते. बैठकीत समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच समाजातील विविध आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

तरूणांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आशिक जोशी यांनी ब्राम्हण समाजातील सर्व समाज बांधवांनी आपापसात असलेले मतभेद दूर करून एकत्र येण्याचे आवाहन केले. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे सांगितले. यावेळी शेखर बुंदेले, राजू तिवारी, मोहन जोशी, शिवदयाल शर्मा, ज्योती भागवत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीत पुरोहित आघाडी, युवा आघाडी, शिक्षक आघाडी, महिला आघाडी, उद्योग आघाडी, डॉक्टर व वकील आघाडी स्थापन करून पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. पुरोहित आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी शिरीष विंचूरकर, युवा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी जितेंद्र तिवारी, शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रविंद्र मनोहर कुलकर्णी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रश्मी बुंदेले, उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी मोहन जोशी तर डॉक्टर व वकील आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रव मोहन शुक्ला यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
शिवदयाल शर्मा यांनी आभार मानले. बैठकीस ज्ञानेश्वर खुरे, बाळ नाईक, सचिन वैद्य, वरून जोशी, चंद्रकांत जोशी, नाना पुराणिक, अविनाश पुराणिक, सुजित पाठक, लोटन पटवारी, डॉ.गोपाल पांडे, प्रमोद पाठक, यशवंत बुंदेले, पी.के.कुलकर्णी, युगेश पाठक, भिकचंद पांचोली, नंदू जोशी, जयश्री कुलकर्णी, जानकी वैद्य, सुलोचना खुरे, विद्या पाठक, लीना जोशी, विद्या पांडे, सरला विंचूरकर यांचेसह तालुक्यातील समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.