ब्राह्मण सभेतर्फे पारंपारिक नृत्य स्पर्धांचे आयोजन

0
जळगाव- ब्राह्मण सभेतर्फे मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी हरतालिका आवरणानिमित्त महिलांसाठी विविध सणांवर आधारित गीतांवर पारंपारिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़  ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभा येथे पार पडेल़.  स्पर्धेत भुलाबाई, आखाजी गणपती तसेच श्रावणातील विविध गीत, लोकगीत, चित्रपट गीतांवर लाईव्ह परफॉर्मन्स, रेकॉर्ड डान्स करायवयाचा आहे़ एका समुहात ६ ते १० जणींचा समावेश असावा, असे पत्रकाद्वारे कळविले आहे़  विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार आहे़ नाव नोंदणीची १० सप्टेंबर ही शेवटीची मुदत आहे़ त्यामुळे ब्राह्मण सभा या ठिकाणी नाव नोंदणी करावी, असे आवाहन रेखा कुलकर्णी यांनी केले आहे़