जळगाव । येथील ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे रविवार, 6 रोजी अप्पा महाराज समाधी मंदिर येथे 8 बटूंचा उपनयन संस्कार संपन्न झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने व्रतबंध कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता झाली. या कार्यक्रमाचे पौराहीत्य रवि जोशी व रविंद्र नाईक यांनी केले. यात मातृभोजन, होमहवन, भिक्षावळ, सोडमुंज यासह बटुंना कसे वागावे याबाबतचे संस्कार देण्यात आले. या व्रतबंध सोहळ्यास श्रीराम मंदिराचे प्रमुख गादीपती मंगेश महाराज, ह.भ.प. मुकूंद धर्माधिकारी व आ. राजूमामा भोळे उपस्थित होते.
शालेय साहित्य भेट
व्रतबंधनिमित्त बटूंना अध्यक्षा रेखा कुळकर्णी, कोषाध्यक्ष अविकुमार जोशी, उपाध्यक्षा विद्या धर्माधिकारी व वसंतराव देखणेंतर्फे पुस्तके व पेन भेट देण्यात आले. किशोर वाकलेकर यांच्याकडून तांब्याचे फुलपात्र तर मुकूंदराव धर्माधिकारी यांच्याकडून पर्यावरणपुरक कागदी पिशवीमध्ये शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक कुळकर्णी, हेमंत कानगो, स्मिता कुळकर्णी, सविता काळे, अजय कुळकर्णी, महिला मंडळाच्या अमला पाठक, मानीनी तपकिरे, नम्रता वाघ, हेमलता कुळकर्णी, कविता कुळकर्णी, आशा बिडकर, ममता जोशी, रुतुजा संत आंदीनी परिश्रम घेतले. अमोल जोशी, अशोक वाघ, लेखराज उपाध्याय, बहुभाषिक संघाचे अध्यक्ष संजय व्यास, सुरेंद्र मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.